हवालातील दोघांना महाबळेश्‍वरमध्ये अटक

रवी माचेकर व शशांक पडगीलवार
रवी माचेकर व शशांक पडगीलवार

नागपूर - पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी हवाला रकमेतील सुमारे अडीच कोटी रुपये  मध्येच लंपास करणाऱ्या दोघांना सोमवारी महाबळेश्‍वर येथे अटक करण्यात आली. अतिशय नियोजनबद्ध रचलेल्या या कारस्थानात नागपूरमधील पोलिसही सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

शनिवारी पहाटे नंदनवन पोलिसांनी खबऱ्यांच्या टीपवरून दोघांना अटक केली होती. त्यांच्या गाडीतून सुमारे तीन कोटी रुपये जप्त केले होते. 

छत्तीसगडमधील रायपूर येथील मॅपल ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक खजान ठक्कर हवालाची रक्कम पोचविण्याचे काम करतो. त्यासाठी त्याने आपल्या वाहनात रक्कम  लपविण्यासाठी विशेष सोय केली आहे. अशीच एक डस्टर गाडी हवालाची पाच कोटी ७३ लाख रुपयांची रक्कम घेऊन रायपूर येथून नागपूरला येत असल्याची माहिती नागपूर येथील अट्टल गुन्हेगार सचिन ऊर्फ शशांक व त्याचा मित्र रवी यांना मिळाली. दोघांनी ही बाब नागपूरच्या  नंदनवन पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिली.

मिळालेल्या महितीनुसार, पोलिसांनी प्रजापती चौकात हवाला रक्कम असलेली डस्टर गाडी (एमएच ३१ एफए ४६११) पकडली. या गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलिस वाहनात बसविण्यात आले.

हवालाच्या रकमेसह पकडलेल्या गाडीत तीन पोलिस कर्मचारी व या गाडीची माहिती देणारे रवी व सचिन असे पाच जण बसले. प्रजापती चौकातून नंदनवन पोलिस ठाणे हे आठ मिनिटांच्या अंतरावर आहे; परंतु ही गाडी ४५ मिनिटांनी पोलिस ठाण्यात पोचली. या ४५ मिनिटांत गाडीतील हवालाची रक्कम असलेल्या पाच कंपार्टमेंटपैकी एक कंपार्टमेंट रिकामे दिसून आले.

वाहनात बसलेले दोन खबरी बेपत्ता झाले होते. जेव्हा हवाला रक्कम असलेली गाडी पोलिस ठाण्यात आली तेव्हा गाडीतून अडीच कोटी बेपत्ता असल्याची तक्रार खजान ठक्कर यांनी पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीमुळे नागपूरचे तीन पोलिस कर्मचारीही संशयाच्या भोवऱ्यात अडकले.

गोव्याला जात होते फिरायला
बेपत्ता झालेले रवी व सचिन यांनी आपल्या बरोबर आणखी आपले दोन सहकारी बरोबर घेऊन ते एन्जॉय करायला बाहेर पडले. जालना येथे खरेदी करून ते औरंगाबाद, पुणे असे फिरत गोव्याला निघाले. दरम्यान, कोल्हापूर येथे पोचल्यानंतर गजा मुगणे याने त्याच्या प्रेयसीला मोबाईल केला.

त्याचवेळी नागपूर पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला गजाचा ठावठिकाणा विचारण्यासाठी पोलिस  ठाण्यात आणले होते. गजाचा तेथेच फोन आला व पोलिसांना त्याचा मोबाईल क्रमांक सापडला. प्रेयसीने सर्व हकिकत गजाला सांगितली. गजाने पोलिस आपला शोध घेत असल्याचे इतरांना सांगितले.

मग त्यांनी गोव्याला जायचे रद्द केले व मुंबईला जाऊन ‘अंडरग्राउंड’ होण्याचा बेत केला. परत येत असताना रात्र झाली होती म्हणून त्यांनी एक दिवस महाबळेश्‍वरला जाण्याचे ठरविले व ते रात्री साडेबारा वाजता महाबळेश्‍वरला पोचले. मात्र, त्यांचे तेथील लोकेशन  पोलिसांना मिळाले आणि ते अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com