भरधाव दुचाकीची धडक; दोन तरुण ठार

file photo
file photo

उमरखेड (जि. यवतमाळ) : बेलखेड फाट्यावर गुरुवारी (ता.12) रात्री दहा वाजताच्या सुमारास दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन तरुण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.
अमृत सुखदेव पांचाळ (वय 25, रा. पळशी) व समाधान कुंडलिक वानखेडे (वय 17, रा. उमरखेड (साखरा) अशी मृतांची नावे असून, सूरज मेसरे (वय 19) व विशाल अडकीने (वय 22) गंभीर जखमी आहेत. अमृत पांचाळ उमरखेड येथून पळशी येथे मोटरसायकलने आपल्या गावी जात होता. त्याचवेळी बेलखेडवरून समाधान वानखेडे याच्यासह इतर दोघे दुचाकीवरून येत होते. या दोन्ही भरधाव दुचाकींची बेलखेड फाट्याजवळ जोरदार धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही मोटरसायकल 100 मीटरपर्यंत रस्त्यावरून घासत गेल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com