दुचाकी पळविणाऱ्या दोघांना अटक

bike thief
bike thief

यवतमाळ : डोक्‍यावर जबरदस्तीने बुक्का मारून दुचाकी पळवून नेणाऱ्या दोन संशयित दुचाकी चोरट्यांना रविवारी (ता.13) ताब्यात घेतले. येथील अवधूतवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.
मो. साजिद मो. इसा, असफाख बेग अमजा बेग (दोघेही रा. अलीमनगर, अमरावती) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवारी सकाळी ज्ञानेश्‍वर नथ्युजी पचकटे (वय 48, रा. राणा प्रतापनगर, यवतमाळ) हे बसस्थानक चौकातील वीज महावितरणच्या कार्यालयाजवळ आले असता, दोघेही जबरदस्तीने दुचाकीवर बसले. आर्णी रोडने चालण्याचा दम दिला. दुचाकी शोरूमजवळ थांबविण्यास सांगितले. पंधरा हजार रुपये दे अन्यथा दुचाकी नेतो, अशी धमकी दिली. त्यांना पचकटे यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोक्‍यावर बुक्का मारून जबरदस्तीने दुचाकी पळवून नेली. अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी शोध घेत आज मो. साजिद व असफाख बेग या दोन संशयितांना ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com