बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

गडचिरोली  : बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल ठार झालग. ही घटना धानोरा तालुक्‍यातील सुरसुंडी व इरूपढोढरी येथे रात्रीच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गडचिरोली  : बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल ठार झालग. ही घटना धानोरा तालुक्‍यातील सुरसुंडी व इरूपढोढरी येथे रात्रीच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुरसुंडी येथील बादलशहा सयाम यांचे बैल गोठ्यात बांधले असता रात्रीच्या सुमारास बिबट्याने बैलावर हल्ला केला. त्यामुळे सुरसुंडी येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्या घटनेत इरूपढोढरी येथील देवाजी उसेंडी यांचा बैल सायंकाळच्या सुमारास जंगल परिसरातून घराकडे येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बैल जागीच ठार झाला. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. वन विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two bulls killed in leopord raid

टॅग्स