महाविद्यालयीन तरुणी देहव्यापारात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

महाविद्यालयीन तरुणी 
सेक्‍स रॅकेटमध्ये सापडलेल्या दोन्ही तरुणी शिक्षण घेत आहेत. एक पदवीच्या द्वितीय वर्षाला तर दुसरी व्यावसायिक अभ्यासक्रमाला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दोघीही काही महिन्यांपासून आंबटशौकिनांच्या बळी ठरत आहेत. केवळ पाचशे रुपयांसाठी दोन्ही तरुणी देहव्यापारात आल्याची माहिती आहे. 

नागपूर - मनीषनगरातील पॉश इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या हायफाय सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला. छाप्यात देहव्यापार करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना पोलिसांनी ताब्यात घेतले, तसेच महिला दलाल कल्पना अशोक मेंचेलवार (35, रा. मनीषनगर) हिला अटक केली आहे. 

कल्पनाचा मनीषनगरात श्रीधर अपार्टमेंटमध्ये देहव्यापार अड्डा सुरू असल्याची माहिती डीसीपी नीलेश भरणे यांना मिळाली. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी दोन पंटर पाठवून खात्री करण्यास सांगितले. फ्लॅटमध्ये कल्पना हिची भेट घेतली असता तिने दोन मुलींना बाहेर बोलावले. दोन्ही मुलींशी पाच हजारांत सौदा झाला. पंटरने दोन्ही मुलींना आतमधील बेडरूममध्ये पाठविले. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा घातला. पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख उमेश बेसरकर, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, बळीराम रेवतकर, साधना चव्हाण, छाया राऊत यांनी ही कारवाई केली. 

महाविद्यालयीन तरुणी 
सेक्‍स रॅकेटमध्ये सापडलेल्या दोन्ही तरुणी शिक्षण घेत आहेत. एक पदवीच्या द्वितीय वर्षाला तर दुसरी व्यावसायिक अभ्यासक्रमाला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दोघीही काही महिन्यांपासून आंबटशौकिनांच्या बळी ठरत आहेत. केवळ पाचशे रुपयांसाठी दोन्ही तरुणी देहव्यापारात आल्याची माहिती आहे. 

नावाला चॉकलेट विक्री 
कल्पना हिने चॉकलेट विक्रीचा बिझनेस करण्याचा देखावा केला होता. इमारतीमध्ये आठ हजारांनी किरायाने फ्लॅट घेतला होता. यामध्ये जवळपास 12 ते 16 महाविद्यालयीन तरुणींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवून देहव्यापाराच्या मार्गी लावले. 

Web Title: Two collegegirls found in a sex racket