मोहाची दारू पिले तरी होतो कोरोना; गावठीचा उतारा ठरला फोल

मोहाची दारू पिले तरी होतो कोरोना; गावठीचा उतारा ठरला फोल

दिग्रस (जि. यवतमाळ) : ‘आम्हाला कोरोना (coronavirus) होऊ शकत नाही. कारण, आम्ही दररोज एक कप मोहाची गावठी दारू पितो. मोहाची दारू (liquor) पिणाऱ्यांना कोरोना होऊ शकत नाही’, असा अजब तर्क सांगणाऱ्या तालुक्‍यातील आनंदवाडी येथील महिलांचा दावा अखेर फोल ठरला. महसूल विभागाने केलेल्या चाचणीत गावातील दोन नागरिक कोविड-१९ ने बाधित असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे ‘कोरोना नाहीच; किंवा आम्हाला कोरोना होऊ शकत नाही’ असे म्हणणाऱ्यांसाठी ही घटना चपराक आहे. (two corona positive found Anandwadi in Yavatmal district)

विज्ञानाने खूप प्रगती केली. परंतु, विज्ञानाचे लाभ अजूनही शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचले नाही. आजही अनेक गावे अशी आहेत की जगात काय चालले याचे त्यांना सोयरसुतक नाही. तालुक्‍यातील आनंदवाडी हे पारधीबहुल गाव. जगात सर्वत्र कोहोराने कहर केला. शासनाने गावागावात चाचण्या सुरू केल्या. मात्र, या गावातील लोकांना प्रतिसाद मिळत नव्हता. कारण, या गावातील लोकांचा बोकडबळीवर विश्‍वास आहे. नवसावर विश्‍वास आहे. कोरोना होऊ नये म्हणून देवीला बोकड्यांच्या बळी देण्याची प्रथा या गावात आहे. त्याही पुढे जाऊन येथील महिलांनी मोहाची गावठी दारू प्याल्याने कोरोना होत नाही, असा जावईशोध लावला.

मोहाची दारू पिले तरी होतो कोरोना; गावठीचा उतारा ठरला फोल
वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

याबाबतची सविस्तर बातमी मंगळवारी दै. सकाळच्या अंकात प्रकाशित होताच तहसीलदार राजेश वझिरे यांनी आनंदवाडी येथे कोरोना चाचणीचे शिबिर घेतले. त्यात दोन नागरिक कोरोनाबाधीत निघाले. अखेर महिलांच्या दाव्यावर पडदा पडला आणि अंधश्रद्धेला थारा उरला नाही. तालुकास्तरीय समिती व ग्रामस्तरीय समितीमाफत जनजागृती करण्यात आली. आनंदवाडी येथील नागरिकांना कोरोनाविषयी माहिती, लक्षणे, उपचार व लसीकरण याबाबत माहिती सांगण्यात आली.

उपस्थित लोकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्यांना मास्क, हात वारंवार धुणे व सामाजिक अंतराचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच कोरोना चाचणीचे शिबिर घेण्यात आले. त्यात ८३ रॅपिड टेस्ट व २३ आरटीपीसीआर टेस्ट, अशा एकूण १०६ टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये २ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

(two corona positive found Anandwadi in Yavatmal district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com