रुग्णसंख्या घटल्याने दोन कोविड सेंटर बंद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट झाल्याने आता दोन कोविड सेंटर सुद्धा बंद करण्यात आले आहे. ही दिलासा देणारी बाब असून १०४५ बेड्‌स सुद्धा रिक्त आहेत.

कोरोनाबाधितांसाठी जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल्स मध्ये १३४५ बेड्‌स तयार करण्यात आले, त्यापैकी आता १०४५ बेड्‌स रिक्त आहेत. प्रशासकीय माहितीनुसार मोझरी, मोर्शी कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. पीडीएमसीमध्ये १२, सुपरस्पेशलिटीमध्ये १३२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये उपलब्ध ५१५ पैकी ४२५ बेड्‌स सद्या रिक्त आहेत. एकूणच ७८ टक्के बेड्‌स सध्या रिक्त आहे. शहरातील दोन कोविड सेंटर बंद झाले असून आणखी दोन खासगी कोविड सेंटर संचालकांकडून बंद करण्याबाबत प्रशासनाला पत्र देण्यात आल्याची माहिती आहे.

अशी आहे रिक्त बेडसची संख्या
सुपर स्पेशालिटी १६८, पीडीएमसी २०२, दयासागर रुग्णालय ३९, बेस्ट हॉस्पिटल २५, बख्तार हॉस्पिटल २५, झेनिथ हॉस्पिटल ८५, डॉ. गोडे हॉस्पिटल ८८, अंबादेवी हॉस्पिटल ५२, एक्‍झॉन ८७, याशिवाय कोविड हेल्थसेंटरचा विचार करता अचलपूर ५५, ट्रामा केअर नांदगाव ४६, डॉ. ढोले हॉस्पिटल५७, मोझरी१००, मोर्शी येथे २० बेडस रिक्त आहेत.

रिकव्हरी रेट ९३ टक्‍क्‍यावर
दिलासा देणारी बाब अशी की ज्या प्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे, त्याच प्रमाणात रिकव्हरी रेट सुद्धा वाढून ९३ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. शिवाय रुग्ण दुप्पटीचा कालावधी सुद्धा १५० दिवसांवर आला आहे.

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com