गडचिरोलीकरांना लावला दहा कोटींचा चुना

file photo
file photo

गडचिरोली : सुविधा फार्मिंग ऍण्ड अलाईड कंपनी मुख्य शाखा भोपाळचे संस्थापक विनोदकुमार जमनाप्रसाद शंखवार व राजेंद्रकरण शंकरलाल राजपूत (दोघेही रा. रायपूर, ह. मु. देहरादून, उत्तराखंड) यांनी या कंपनीमार्फत अभिकर्त्यांद्वारे ठेवी स्वीकारून पोबारा करीत गडचिरोलीकरांना तब्बल दहा कोटी रुपयांचा चुना लावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदकुमार शंखवार व राजेंद्रकरण राजपूत यांनी स्थानिक बट्टूवार कॉम्प्लेक्‍स येथे भाड्याची खोली घेऊन या कंपनीची शाखा सुरू केली. अभिकर्त्यांच्या मार्फत नागरिकांना जास्त कमिशनचे आमिष दाखवून ठेवी जमा केल्या. सिक्‍युरिटीज ऍण्ड एक्‍सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ची मनाई असतानाही मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून ठेवीची मुदत होण्यापूर्वीच शाखा बंद करून दोघेही पसार झाले. त्यांच्याविरोधात गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून त्यांच्या तपासात या दोन्ही आरोपींनी सुमारे दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींविरुद्ध नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अटक वॉरंट जारी केले असून हे आरोपी दिसल्यास पोलिसांना 9823397255 व 07132-222100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com