आयकर विभागाची कारवाई, दोन कोटी जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

अमरावती : शहरातील बिल्डर तसेच व्यावसायिकांकडे आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आजपर्यंत दोन कोटी रुपयांवर रोख तसेच लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारवाई आटोपून नागपूरला प्रयाण केले.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात ही कारवाई सुरू होती. त्यामुळे बिल्डर तसेच व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले होते. संबंधित बिल्डरपैकी काहींच्या लॉकरचीसुद्धा आज तपासणी करण्यात आली असून काही दस्तऐवज जप्त करण्यात आले. या दस्तऐवजांची तपासणी आता आयकर विभागाचे अधिकारी करीत आहेत. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्‍चित होणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: two crores saized in income tax department raid