मी कस्टमर केअरमधून बोलतोय आणि पुढे काय झाले...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा, असे आवाहान पोलिसांतर्फे गेल्या काही दिवसांपासून वारंवार करण्यात येत आहे. तरीही सामान्य नागरिकांना लुबाडण्याचे प्रमाण वाढतच आहे. कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एकाला, तर दुसऱ्याला लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून लुबाडल्याच्या घटना उघडकीस नुकत्याच उघडकीस आल्या. ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी दोघांच्या तक्रारीवरून फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.


वरुड तालुक्‍याच्या आमनेर येथील नीलेश सोमेश्वर हिरुळकर (वय 35) यांना 8918247796 या क्रमांकावरून फोन आला. संपर्क साधणाऱ्याने कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही लिंक्‍स पाठवून, त्यानुसार प्रोसेस करायला लावली. तोतया कस्टमर केअरच्या अधिकाऱ्याने हिरुळकर यांच्या बॅंकखात्याची गोपनीय माहिती प्राप्त केली. त्याआधारे त्यांच्या खात्यामधून 88 हजार 881 रुपये एवढी रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली. हिरुळकर यांना त्यांच्या खात्यातून सदर रक्कम काढल्याचा मॅसेज आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ ग्रामीणच्या सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली असता, गुन्हा नोंदविण्यात आला.

दुसरी फसवणुकीची घटना चांदूरबाजार तालुक्‍यातील घाटलाडकी गावातील युवकाच्या बाबतीत घडली. अब्दुल कलाम अब्दुल करीम (वय 58) यांच्या पुतण्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आले. त्याला पंचवीस लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून, तोतयाने त्यानंतर काही दिवस वेगवेगळ्या कारणासाठी अ.कलाम यांच्या पुतण्याकडून ऑनलाइन रक्कम विविध टप्प्यामध्ये भरायला सांगितले. जवळपास 44 हजार 100 रुपये त्याने तोतयाच्या घशात घातले. अब्दुल कलाम याच्या तक्रारीवरून ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार टाळणे हिताचे
सायबर गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ झाली आहे. ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही. त्याच्यावर विश्‍वास ठेवल्याने, त्याने सांगितल्यानुसार प्रोसेस केल्याने अनेकांची फसवणूक होत आहे. नागरिकांनी अशा अनोळखी तोतया व्यक्तींसोबत ऑनलाइन आर्थिक व्यवहार टाळणे हिताचे ठरते, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केल्या जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com