भीषण अपघातात दोन ठार; दोन जखमी 

अनिल कांबळे
सोमवार, 26 मार्च 2018

अमर सिंग (वय 30, रा. लखनऊ, उत्तरप्रदेश) आणि मोहम्मद इद्रीस (लखनऊ) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. राहुल अशोक मेहरा (वय 40, अंधेरी वेस्ट, मुंबई) आणि हार्दिक पटेल (मुंबई) अशी जखमींची नावे आहेत

नागपूर - भरधाव कार चालवित असताना चालकाला अचानक डुलकी आल्याने कार दुभाजकावर आदळली. या अपघातात कारचालकासह दोघे जागीच ठार झाले तर दोन युवक गंभीर जखमी झाले.

हा अपघात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत सावनेर महामार्गावर झाला. अमर सिंग (वय 30, रा. लखनऊ, उत्तरप्रदेश) आणि मोहम्मद इद्रीस (लखनऊ) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. राहुल अशोक मेहरा (वय 40, अंधेरी वेस्ट, मुंबई) आणि हार्दिक पटेल (मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: two dead in an accident