वाशीम : सायकल-मोटरसायकल अपघातात दोन ठार

accident
accident

वाशीम : रिसोड तालुक्यातील हराळ फाट्यावर सायकल-मोटरसायकल अपघात होऊन दोन जण ठार झाले. हि घटना सोमवारी रात्री अकरा वाजता घडली. 

याबाबत प्राप्त माहीतीनुसार, हराळ येथील राजकुमार जयराम सरकटे (वय 40) हे सायकलने रिसोडवरून हराळडे असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलने सायकलस्वारास जबर धडक दिली. या अपघातात सायकलस्वार राजकुमार सरकटे (रा. हराळ) व मोटरसायकलस्वार भिमराव शेळके (वय 46 रा. सवड) हे जागीच ठार झाले.

राजकुमार सरकटे हे रिसोड येथे शेतमजुरी करीता गेले होते. या घटनेने सवड व हराळ परिसरात शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com