नादुरुस्त ट्रकला मिनीबस धडकून दोन ठार; 17 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

वरोरा - वरोरा-वणी मार्गावरील शेंबळ गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला मिनीबसने धडक दिल्याने पहाटे तीन वाजता झालेल्या अपघातात दोन ठार; तर 17 जण जखमी झाले. बोरकंडाबाई हिवराज मेश्राम (वय 60) व छाया दिनेश मोहुर्ले (वय 40 दोघेही रा. वरोरा) अशी मृतांची नावे आहेत.

वणी येथून मिनीबस (एमएच 34 एबी 7280) वरोराकडे येत होती. शेंबळ शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या नादुरुस्त ट्रक (एमएच 29 टीओ 379) उभा होता. मिनीबसच्या चालकास ट्रक न दिसल्याने मिनीबसची ट्रकला मागून जोरदार धडक बसली. यात मेश्राम आणि मोहुर्ले यांचा जागीच मृत्यू झाला. त्या दोघीही होमगार्ड पथकात कार्यरत होत्या.

Web Title: two death in accident

टॅग्स