क्रेन पलटल्याने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

दारव्हा (जि. यवतमाळ) - विहिरीतील गाळ उपसा करताना क्रेन पलटल्याने दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 17) गोंडेगाव शिवारात घडली. नरेश अनंता तुमराम (वय 35), राजू कुडवे (वय 45 दोघेही रा. सायखेडा (खुर्द), अशी मृतांची नावे आहेत. रामेश्‍वर लोहकरे यांच्या शेतातील विहिरीत चार मजूर गाळ उपसा करीत होते. त्यापैकी एक वर आला. त्यानंतर उरलेले तीन मजूर क्रेनच्या बकेटमध्ये बसून वर येत असताना चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे बकेट विहिरीच्या थडीला लागून तुमराम व कुडवे विहिरीत पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Web Title: two death by crain overdue