ट्रकच्या धडकेत दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

मौदा - वडोदा कुही मार्गावर नान्हा (मांगली) शिवारात शनिवारी (ता. सात) सकाळी सातच्या सुमारास देवेंद्र लक्ष्मीकांत भगत (वय ३५, कुही) व सूरज रमेश मांढरे (वय ३०, कुही) यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे दोघेही जागीच ठार झाले.

देवेंद्र भगत हा मौदा येथील एनटीपीसी येथे कार्यरत होता. नेहमीप्रमाणे देवेंद्र व त्याचा मित्र सुरेश हे दुचाकीने कामावर येत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सध्या रस्त्याचे सिमेंटीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सरस्वती कन्ट्रक्‍शन कंपनीकडे आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी माती भरण्याचे काम सुरू आहे. परंतु, कामाचे योग्य नियोजन नसल्यामुळे या रस्त्यावर वाहनामुळे धूळ उडते. कंपनीकडून त्यावर पाणी टाकले जात नाही. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे हा अपघात घडला आहे. त्यातच काम सुरू असलेल्या मार्गावर सुरक्षा, सुविधा ठेवणे बंधनकारक असते. परंतु, या मार्गावर सुविधांचा मार्गावर पूर्णपणे अभाव आहे. त्यामुळे अपघातास जबाबदार असलेल्या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृताचे नातेवाईक सुधीर भगत, अमित लोखंडे, समीर चिमोटे यांनी केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर धोपाडे, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पुळके, शिपाई देशमुख करीत आहेत.

Web Title: two death in truck accident