उपराजधानीत थंडीमुळे दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

उपराजधानीत थंडीमुळे दोघांचा मृत्यू
नागपूर : कडाक्‍याच्या थंडीने उपराजधानीत एका ज्येष्ठ नागरिकासह दोन जणांचा बळी घेतला. दोघेही सक्‍करदरा परिसरात मृतावस्थेत आढळून आले.

उपराजधानीत थंडीमुळे दोघांचा मृत्यू
नागपूर : कडाक्‍याच्या थंडीने उपराजधानीत एका ज्येष्ठ नागरिकासह दोन जणांचा बळी घेतला. दोघेही सक्‍करदरा परिसरात मृतावस्थेत आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्‍करदरा पोलिस ठाण्याअंतर्गत मोठा ताजबागजवळील सुरक्षा भिंतीजवळ एक 60 वर्षीय व्यक्‍ती गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आली. याच परिसरातील मोहता विज्ञान महाविद्यालयाच्या उड्‌डाणपुलाखाली 25 ते 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. दोघेही थंडीमुळे मरण पावल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. काही दिवसांपासून विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. शुक्रवारीही विदर्भात थंडीचा कडाका कायम राहिला. गुरुवारच्या तुलनेत शहरात पारा अर्ध्या अंशाने चढला असला, तरी हवेतील गारठा कायम आहे. शुक्रवारी नागपूर आणि वर्धा येथे विदर्भातील सर्वांत कमी (12.4 अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद करण्यात आली.

Web Title: two deth news