विहिरीतील विषारी वायूमुळे शेतकऱ्यासह दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कुरखेडा, (जि. गडचिरोली) : शेतातील मोटारपंपाचा नादुरुस्त फुटबॉल दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या रोजंदारी मजूर व शेतमालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 11) सायंकाळी सहाच्या सुमारास आंधळी फाट्याजवळ असलेल्या शेतात घडली. विहिरीतील विषारी वायूमुळे दोघांचाही मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रमोद निर्मलदास डहाळे (40, रा. चिखली व रोजंदारी मजूर अजय जयराम मच्छीरके (25) असे मृतांचे नावे आहेत. शेतकरी प्रमोद डहाळे यांची आंधळी फाट्यावर शेतजमीन आहे. आज सायंकाळी शेतातील विहिरीत मोटारपंपाच्या फुटबॉलमध्ये बिघाड असल्याचे त्यांचा लक्षात आल्याने त्याने मजूर अजय मच्छीरके याला विहिरीत उतरवले. मात्र, तो पाण्यात पडून बुडू लागल्याने काठावर असलेला शेतमालक प्रमोद डहाळे याने बचावाकरिता शेजारील शेतकऱ्याला हाक देत ते स्वतःही विहिरीत उतरले. परंतु, मदत मिळण्यापूर्वीच तेसुद्धा विहिरीच्या पाण्यात बुडाले. दोघांचाही मृत्यू विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून झाला असावा, असा अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी घटनास्थळावरून जवळच असलेल्या एका अन्य शेतातील विहिरीतसुद्धा विषारी वायूने गुदमरून एका शेतमजुराचा मृत्यू झाला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two die with farmer due to poisonous gas in wells