अकोला महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू 

अनिल दंदी
सोमवार, 7 मे 2018

रिधोरा गावातील पोलिस पाटील व शिवसेनेचे पवन अग्रवाल हे बाळापूरहून रिधोराकडे जात असताना त्यांना हे दोघे महामार्गावर पडलेले दिसले.

अकोला - राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी फाट्यावर अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून दोघेही बाळापूरकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

हा अपघात एवढा जबरदस्त होता की, ठार झालेल्या एकाचे डोळे धडा पासून वेगळे झाले आहे. रिधोरा गावातील पोलिस पाटील व शिवसेनेचे पवन अग्रवाल हे बाळापूरहून रिधोराकडे जात असताना त्यांना हे दोघे महामार्गावर पडलेले दिसले. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता दोघांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Two died in an accident on Akola highway