सर्पदंशाने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

भंडारा : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सर्पदंश झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. पल्लवी अशोक शहारे (वय 20, रा. साखळी) आणि चंद्रभान विक्रम वंजारी (वय 45, रा. जांभळी सडक) अशी मृतांची नावे आहेत. तुमसर तालुक्‍यातील साखळी येथील पल्लवी हिला बुधवारी दुपारी विषारी सापाने चावा घेतला. तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साकोली तालुक्‍यातील जांभळी सडक येथील चंद्रभान याला बुधवारी रात्री सर्पदंश झाला. त्याला प्रथमोपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भंडारा : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सर्पदंश झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. पल्लवी अशोक शहारे (वय 20, रा. साखळी) आणि चंद्रभान विक्रम वंजारी (वय 45, रा. जांभळी सडक) अशी मृतांची नावे आहेत. तुमसर तालुक्‍यातील साखळी येथील पल्लवी हिला बुधवारी दुपारी विषारी सापाने चावा घेतला. तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साकोली तालुक्‍यातील जांभळी सडक येथील चंद्रभान याला बुधवारी रात्री सर्पदंश झाला. त्याला प्रथमोपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून घटनेची नोंद केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two died of snake bite

टॅग्स