प्राणहिता नदीत नाव उलटून दोन प्रवाशांना जलसमाधी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

वांगेपल्ली येथील प्राणहिता नदी ओलांडली की, तेलंगणा राज्याची सीमा सुरू होते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील प्रवासी नावेने प्रवास करतात. आज सकाळी वांगेपल्ली येथून एक नाव प्रवासी घेऊन तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्याच्या दिशेने जात होती. मात्र, मध्येच नाव हेलकावे घेऊन उलटली.

सिरोंचा (जि.गडचिरोली) : अहेरी तालुक्‍यातील वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीत नाव उलटल्याने 6 प्रवासी बुडाले. त्यातील 4 जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले असून, 2 प्रवासी बेपत्ता आहेत. ही घटना रविवारी (ता. 1) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. बेपत्ता व्यक्तींचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

बानो सुरेश शंकर नायक बानो (27) जिल्हा आसिफाबाद व मुंजम बाळकृष्णम (25), जिल्हा कागजनगर(तेलंगणा) अशी बेपत्ता व्यक्तींची नावे असून, ते तेलंगणा राज्यात वनरक्षक असल्याची माहिती पुढे येत आहे. 

Image may contain: 1 person, outdoor
मुंजम बाळकृष्णम

चार जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले 
वांगेपल्ली येथील प्राणहिता नदी ओलांडली की, तेलंगणा राज्याची सीमा सुरू होते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील प्रवासी नावेने प्रवास करतात. आज सकाळी वांगेपल्ली येथून एक नाव प्रवासी घेऊन तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्याच्या दिशेने जात होती. मात्र, मध्येच नाव हेलकावे घेऊन उलटली. या अपघातात 6 प्रवासी पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा व गडचिरोली जिल्ह्याची आपत्ती निवारण चमू व पोलिस घटनास्थळी पोचली त्यांनी शोध मोहिम राबवून 4 जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. त्यापैकी दोन जणांना गुंडेम येथील नदी काठावर, तर दोघांना वांगेपल्ली काठावर सुरक्षितरीत्या पोचविण्यात आले. मात्र अन्य दोघे बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. 

क्लिक करा -तीन बायकांच्या दादल्याची अजबगजब कहानी वाचली का?
 

Image may contain: 3 people, outdoor
बानो सुरेश शंकर नायक बानो

 

हेही वाचा - सावधान नागरिकांनो: मरण तुमच्या घरात!
 

उपाययाजनांकडे दुर्लक्ष 
सिरोंचा लगत असलेल्या गोदावरी व प्राणहिता नदीत नाव उलटून अनेकदा जीवित हानीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेलंगणा, आंध्रप्रदेशातून सिरोंचा येथे ये-जा करण्यासाठी नावेचा वापर केला जातो. मात्र, सुरक्षेतेबाबत उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येथे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक नावेतून केली जात असल्याने दुर्घटना होत आहेत. दोन ठिकाणी पूल बांधकामामुळे नदीतून प्रवाशी वाहतूक कमी झाली असली तरी वेळेची व पैशाची बचत करण्यासाठी नावेचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two drowne in pranhita river