विदर्भात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

नागपूर : कर्ज व नापिकीच्या चटक्‍याने हवालदिल झालेल्या विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (ता. 20) उघडकीस आले. यात भंडारा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

नागपूर : कर्ज व नापिकीच्या चटक्‍याने हवालदिल झालेल्या विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (ता. 20) उघडकीस आले. यात भंडारा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आंधळगाव (जि. भंडारा) : येथून जवळ असलेल्या धोप येथील सुभाष विनायक मने (वय 45) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. सुभाष शेतीसह दुधाचा व्यवसाय करीत होते. त्यांच्यावर 8 ते 10 लाखांचे खासगी पतसंस्था, महिला बचतगट व इतर बॅंकेचे कर्ज होते. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे कर्जाची परतफेड करणे शक्‍य झाले नाही. मागील 15 दिवसांपासून ते विवंचनेत होते. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या मागे आईवडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा बराच आप्तपरिवार आहे.

Web Title: two farmer commited suicide in vidharbha