दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

नागपूर : कर्ज आणि नापिकाला कंटाळून विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी (ता. 28) उघडकीस आले. यात शिरोली येथील राजू जाधव (वय 47, ता. घाटंजी, जि. यवतमाळ), रोहणा येथील अंबादास मेश्राम (61, ता. आर्वी, जि. वर्धा) यांचा समावेश आहे.

घाटंजी (जि. यवतमाळ) : शिरोली येथील शेतकरी राजू जाधव यांनी आपल्या राहत्या घरात विष पिऊन मंगळवारी (ता. 27) रात्री आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यावर सोसायटी व खासगी कर्ज आहे. या वर्षी पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्याची ताकद नसल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
आर्वी (जि. वर्धा) : रोहणा येथील शेतकरी अंबादास मेश्राम यांच्याकडे बोथली शिवारात पाच एकर शेती आहे. या शेतीवर बॅंक ऑफ इंडिया शाखेचे एक लाख पाच हजार रुपये कर्ज आहे. यंदा अल्प उत्पादन झाल्याने ते सतत विवंचनेत राहायचे. शेतीवर कुटुंबाची उपजीविका होत नसल्याने ते टेलरिंगचा व्यवसाय करायचे. यातून कर्जाची परतफेड होणार नाही, या विवंचनेत असताना त्यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली असा आप्तपरिवार आहे.

Web Title: two farmers commited suicide