अमरावती जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

अमरावती : सततची नापिकी व कर्जबाजारी झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील मुऱ्हादेवी येथील शेतकऱ्याने स्वतःच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. चार) घडली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव रवींद्र रूपराव राऊत (वय 55) आहे.

अंजनगावसुर्जी तालुक्‍यात चार वर्षांपासूनची सततची नापिकी आणि या वर्षी उशिरा आलेल्या पावसाने शेतकरी हैराण झाले. यंदा मुऱ्हादेवी परिसरात सर्वांत उशिरा पेरण्या झाल्या. अशातच रवींद्र राऊत यांनी दोन एकर शेतात कपाशीचे पीक पेरले. सध्या समाधानकारक पाऊस असला, तरी दोन-तीन वर्षांच्या नापिकीमुळे खचलेले श्री. राऊत यांनी आपल्या राहत्या घरात पत्नी व मुलगी शेतात कामाला गेली असता रविवारी (ता. चार) दुपारी 1 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरी घटना नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यातील जामगाव येथे घडली. सततची नापिकी व बॅंकेच्या कर्जामुळे गजेंद्र गुणवंत बनारसे (वय 46) यांनी आत्महत्या केली. बनारसे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे व इतर कर्ज मिळून 50 हजार रुपयांचे कर्ज आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कर्मचारी कर्ज परत करण्यासाठी सतत तगादा लावत असल्याने श्री. बनारसे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two farmers commited suicide in amravati district

टॅग्स