यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

यवतमाळ : राळेगाव तालुक्‍यातील वडकी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आष्टोणा व सावरखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही घटना आज, बुधवारी घडली.
आष्टोणा येथील महेश तुकाराम काकडे (वय 32) यांनी सकाळी शेतात विष प्राशन केले. ही घटना उघडकीस येताच त्यांना वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. महेश यांच्याकडे चार एकर शेती असून, त्याच्यावर बॅंकेचे कर्ज आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन मुली आहेत.

दुसऱ्या घटनेत सावरखेड येथील भारत महादेव चिडाम (वय 48) यांनी गावाजवळ असलेल्या नारायण हिवरकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. सचिन चिडाम यांनी वडकी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू
महागाव ः शेतात गेलेल्या फुलसावंगी येथील शेतकऱ्याचा मृतदेह आज, बुधवारी सकाळी आढळून आला. मारोती राघो मुळे (वय 55) असे मृताचे नाव आहे. सकाळी अकराला ते शेतात गेले होते. दुपारी एकला त्यांचा मृतदेह आढळून आला. मारोती मुळे यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली की, त्यांचा घातपात झाला याबाबत शंका आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two farmers commited suicide in yavatmal district