वर्धेत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

वर्धा - सेवाग्रामनजीक करंजी (भोगे) येथे एका शेतकऱ्याने विष प्राशन केल्यानंतर विहिरीत उडी घेऊन आज, सोमवारी आत्महत्या केली. तर विष प्राशन केलेल्या आर्वी येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता.१८) कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला.

करंजी भोगे येथील सुरेश ऊर्फ बालू बाबाराव भोगे (वय ४७) यांच्याकडे नऊ एकर शेती आहे. त्यांच्यावर स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे चार लाखांचे कर्ज होते. पुरेसे उत्पन्न न झाल्याने कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे काही दिवसांपासून ते विचलित होते. आज त्यांनी विष प्राशन केल्यानंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. आर्वी येथील गणेश देवराव नागोसे (वय ५५) यांच्याकडे खडकी शिवारात ५ एकर शेती आहे. त्यांनी स्टेट बॅंकेकडून १ लाखाचे कर्ज काढले. शिवाय सोने तारण ठेवून ५० हजार रुपयांचे सुवर्ण कर्जही काढले होते. मात्र, शेतीच्या लागवडीचाही खर्च निघाला नाही. कर्जाच्या वसुलीसाठी तगादा सुरू झाल्याने शनिवारी (ता. १३) त्यांनी विष प्राशन केले. सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेताना गुरुवारी (ता. १८) त्यांचा मृत्यू  झाला. पुढील तपास सेवाग्राम व आर्वी पोलिस करीत आहेत.

Web Title: Two farmers suicides in Wardha