दोन ठिकाणी मालगाडीचे डबे घसरले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

विरूर स्टे. (जि. चंद्रपूर) - विशाखापट्टनम्‌ येथून येणारी एम.एल.एस.डब्ल्यू. गुड्‌स या रेल्वेगाडीचे १६ डब्बे रुळावरून घसरले. ही घटना विहीरगाव स्थानकाजवळ शुक्रवारी (ता. ६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामुळे दक्षिण मध्य सेंट्रल सिकंदराबाद रेल्वेलाइनवरील सर्व लांबपल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

दक्षिण मध्य सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद लाइनवरून प्रवासी आणि मालवाहक सुमारे १२० गाड्यांचे आवागमन सुरू असते. शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराला विशाखापट्टनम येथून बल्लारपूरच्या दिशेने कोळसा घेऊन जाणाऱ्या भरधाव मालगाडीचे १६ डब्बे घसरले. यात जीवितहानी झाली नाही; परंतु रेल्वेगाडीचे नुकसान झाले.

अपघातानंतर या मार्गावरून धावणाऱ्या नवजीवन, केरला, तमिळनाडू, राजस्थानी व अन्य सुपरफास्ट रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. चारशे मजूर आणि यंत्राच्या साहाय्याने रुळावरून डब्बे हटविण्याचे काम सुरू आहे. नुकसानग्रस्त डब्ब्यांतून कोळसा काढण्याचे काम सुरू आहे. शनिवारी सकाळपर्यंत डब्बे हटविण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच दक्षिण मध्य सेंट्रल रेल्वेच्या सिकंदराबाद मुख्यालयातून डी. एस. क्रिल्टीफोर्स, आशीष अग्रवाल, मधुसूदन राव, डॉ. सुमित शर्मा, रेल्वे डीवायएसपी बी. मुर्ली क्रिष्णा, पीएसआय सत्यंद्रकुमार, राजुऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख, पोलिस उपनिरीक्षक श्‍याम गव्हाणे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप बेहेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: The two fell in freight containers