esakal | झाडं तोडण्यासाठी केलेले सीमांकन चुकीचे आहे; शिथिलता हवी तर हे करा...
sakal

बोलून बातमी शोधा

Two Forest Range Officer Trapped by Bribery Prevention Department

लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सापळा रचला. आरएफओ दिवाकर कोरेवार यांना आरएफओ प्रेरणा उईके यांच्यामार्फत एक लाख 75 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

झाडं तोडण्यासाठी केलेले सीमांकन चुकीचे आहे; शिथिलता हवी तर हे करा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे तोडण्यासाठी केलेले सिमांकन चुकीचे असल्याचे सांगून लाकूड कंत्राटदाराकडून एक लाख 75 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दोन वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. दिवाकर रामभाऊ कोरेवार (48) व प्रेरणा उईके(34) असे जाळ्यात अडकलेल्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची नावे आहेत. दिवाकर कोरेवार हे वडसा वनविभागात संरक्षण व अतिक्रमण निर्मूलनाच्या फिरत्या पथकात तर प्रेरणा उईके या कोरची तालुक्‍यातील बेळगाव वनपरिक्षेत्रात अधिकारी आहेत. 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत सोहले येथील दोन आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सागवानाची झाडे आहेत. ही झाडे तोडण्याचे कंत्राट कोरची येथील एका व्यक्तीने घेतले होते. त्यासाठी संबंधित विभागाकडून जमिनीचे सीमांकन करण्यात आले. परंतु, सीमांकन चुकीचे असून, सर्वे क्रमांक एक ते अकरामधील मालाच्या चौकशीत शिथिलता देण्यासाठी फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिवाकर कोरेवार यांनी कंत्राटदारास दोन लाखांची लाच मागितली. तडजोडीअंती सौदा एक लाख 75 हजारांत झाला.

अधिक माहितीसाठी - आंबटशौकिनांच्या मागणीत प्रचंड वाढ... बंद ब्यूटी पार्लर, ढाब्यांमध्ये रंगतोय खेळ

मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सापळा रचला. आरएफओ दिवाकर कोरेवार यांना आरएफओ प्रेरणा उईके यांच्यामार्फत एक लाख 75 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

एसीबीच्या पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, पोलिस नाईक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई गणेश वासेकर, महेश कुकुडकर व घनश्‍याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.

क्लिक करा - Video : धन्यवाद, आभार व्यक्‍त करताना त्यांना रडू कोसळत; न्यायालयानेही केले कौतुक, कोण आहेत 'ते'?

लाखो रुपयांचे सागवान फस्त

वडसा वनविभागाअंतर्गत काही वनाधिकाऱ्यांनी बेळगाव वन परिक्षेत्रात आदिवासी खसरा म्हणून जंगलातील लाखो रुपयांचे सागवान फस्त केले आहे. कोरची तालुक्‍यातील मयालघाट येथे आदिवासींच्या शेतातील फक्त चाळीस घनमीटर सागवान अपेक्षित असताना जंगलातील 93 घन मीटर सागवान गोंदिया जिल्ह्यात विकल्याची चर्चा काही दिवसांपासून वन विभागाच्या कर्मचारी वर्गात सुरू आहे. त्यामुळे एक वर्षापासून आदिवासी खसरे किती झाले व या खसऱ्यांचे सिमांकन खरंच बरोबर आहे की नाही, याची खात्री करून सखोल चौकशी केली तर खूप मोठे घबाड समोर येईल, असे बोलले जात आहे.