अती वेगाने घेतला मित्रांचा जीव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

बुुटीबोरी (जि. नागपूर) : : उमरेडमार्गे गावाकडे परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उमरेड मार्गावरील देवळी गुजरनजीक गुरुवारी (ता.17) सायंकाळी आठच्या दरम्यान घडली. पुण्यवसू राजू शेंदरे (19) आणि गणेश मनोहर वावधने (19, दोघेही रा.शिरुळ) असे या घटनेत ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार दोघेही मित्र असून ते औद्योगिक क्षेत्रातील एका खासगी कंपनीत कामाला होते. गुरुवारी सुटी झाल्यानंतर काही कामानिमित्त दुचाकीने ते बाहेर गेले होते अशी माहिती त्याच्या गावातील मित्रांकडून कळली.

बुुटीबोरी (जि. नागपूर) : : उमरेडमार्गे गावाकडे परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उमरेड मार्गावरील देवळी गुजरनजीक गुरुवारी (ता.17) सायंकाळी आठच्या दरम्यान घडली. पुण्यवसू राजू शेंदरे (19) आणि गणेश मनोहर वावधने (19, दोघेही रा.शिरुळ) असे या घटनेत ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार दोघेही मित्र असून ते औद्योगिक क्षेत्रातील एका खासगी कंपनीत कामाला होते. गुरुवारी सुटी झाल्यानंतर काही कामानिमित्त दुचाकीने ते बाहेर गेले होते अशी माहिती त्याच्या गावातील मित्रांकडून कळली. गावी परत येत असताना कोलारनजीक सायंकाळी आठच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आसिफराजा शेख, मयूर ढेकले आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले. अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास बुटीबोरी पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two friends die in vehicle collision