गरबा खेळताना अकाेला येथे दाेन गटांत भांडण

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

मुंगीलाल बाजोरिया ग्राउंड वर गरबा संपल्यावर दोन गटात तुफान हाणामारी झाली.

अकोला : मुंगीलाल बाजोरिया ग्राउंड वर गरबा संपल्यावर दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेत गामा ठाकूर नामक व्यक्ती वर अनिकट येथीलल काही युवकांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्यामुळे त्याला अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कदम व पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. परिस्थिती नियंत्रणात आणून पुढील कारवाई सुरू करण्यात आली होती. सदर प्रकरणामध्ये जखमींच्या समर्थकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोर गर्दी केली होती.

पोलिसांनकडून सौम्य लाठीचार्ज 
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. घटनेचे गांभीर्य ओळखून खादान, रंदासपेठ आणि सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two groups fight in Akola