दोन देशी कट्टे जप्त, तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

अमरावती : गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक नागपुरीगेट व गाडगेनगर भागात दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून प्रत्येकी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले. या दोघांसह त्यांना देशीकट्टा उपलब्ध करून देणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीलासुद्धा अटक करण्यात आली.

रहेमानखान अयुब खान (वय 19, रा. झेंडा चौकाजवळ, पठाणपुरा, अमरावती), मोहम्मद इस्ताक मोहम्मद युनूस (वय 30, रा. गुलिस्तानगर), अशी देशी कटट्यासह पकडलेल्यांची नावे आहेत. त्यांनी हे देशीकट्टे शोएब असलम ऊर्फ बिल्ली मोहम्मद सलीम (वय 32, रा. छायानगर) याच्याकडून विकत आणल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी शोएब असलम यालासुद्धा अटक केली. देशी कट्ट्याची किंमत प्रत्येकी 25 हजार रुपये आकारण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two indigenous guns seized, three arrested

टॅग्स