काश्मिरच्या दोन विद्यार्थ्यांना यवतमाळ शहरामध्ये मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

‘काश्मिरमध्ये परत जा’, असे म्हणत एका राजकीय पक्षाच्या युवा संघटनेच्या दहा ते 12 कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. ही घटना येथील वाघापूर परिसरातील वैभवनगरात काल बुधवारी (ता.20) रात्री घडली.

यवतमाळ : येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या जम्मू काश्मिरमधील दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली.

‘काश्मिरमध्ये परत जा’, असे म्हणत एका राजकीय पक्षाच्या युवा संघटनेच्या दहा ते 12 कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. ही घटना येथील वाघापूर परिसरातील वैभवनगरात काल बुधवारी (ता.20) रात्री घडली.

पुलवामा येथील जवानांवरील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही मारहाण केल्याची चर्चा आहे. जखमी झालेल्या दोघांनी लोहारा पोलिसांत धाव घेऊन याबाबतची तक्रार दाखल केली आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, लोहारा पोलिस मारहाण केल्याचा आरोप असलेल्या कार्यकर्त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबतची सविस्तर माहिती अद्यापपर्यंत मिळाली नाही.

Web Title: two kashmir youth beaten in Yavatmal