
चंद्रपूर : शहरातील नव्याने वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील तिघेही पुलाखाली कोसळले. यात घटनास्थळी एकाचा, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताचे नाव लोखंडी विठ्ठल मेश्राम (वय २४ ), रवी उर्फ साहिल संजय ढवस असे आहे. सुयोग सुरेश डांगे हा गंभीर आहे. अपघाताची ही घटना शनिवार (ता. ७) घडली.