विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

देवलापार (जि. नागपूर) : मद्यधुंद कारचालकाने मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक व त्यानंतर कंटेनरला आदळलेल्या कारमधील एकाचा मृत्यू तर इतर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना देवलापारनजीक बांद्रा येथे नागपूर-जबलपूर मार्गावर घडली.

दुचाकीस्वार राजकुमार मानसिंग भलावी (वय 45) व रोहन रमेश मंगलानी (वय 35, रा. कामठी) अशी मृताची नावे आहेत. तर बंटी हड्डीका (वय 30), प्रीतेश शर्मा (वय 30) व राहुल पारवानी (वय 30, सर्व रा. कामठी) हे जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-जबलपूर मार्गावर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास राजकुमार भलावी हे वडंबाकडून बांदाकडे जात होते. वळणमार्गावर मागून भरधाव आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात राजकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडकेमुळे कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित कार महामार्गाच्या विरुद्ध दिशेने दुभाजकावर आदळून पुन्हा त्याच दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडक दिली. कार भरधाव असल्याने कंटेनरवर आदळताच तिचा चेंदामेंदा झाला. कारचालकाच्या बाजूला बसलेल्या रोहन मंगलानीचा जागीच मृत्यू झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in a strange accident