अवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू

Ritesh Chavre
Ritesh Chavre

अवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू
टेकाडी (नागपूर) : गोंडेगाव खुल्या कोळसा खाणीतून अवैधरीत्या कोळसा खनन करणाऱ्या दोघांच्या अंगावर दरड कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. रितेश भीमराव चवरे (वय 30) व सतीश उर्फ मुन्ना केशव देशमुख (वय 35, दोघेही रा. कामठी) अशी मृतांची नावे आहेत.
कन्हान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दोघेही खुल्या खाणीतून कोळशाची चोरी करून विक्री करत होते. मंगळवारी पहाटे 5 वाजता मृतांसह अन्य काही व्यक्ती खाणीत कोळसा काढण्यास आले. चांगल्या दर्जाचा कोळसा काढण्यासाठी जीव मुठीत घेऊन कोळशाच्या दरी खाली बसून लोखंडी साहित्याने कोळसा काढत असताना दरड कोसळली. दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यात यशस्वी झाले नाहीत. बराच वेळ ते मदतीसाठी हाका मारत होते. मात्र, सोबतच्या अन्य व्यक्तींनी पळ काढला. त्यांनीच मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. वेकोलि सुरक्षारक्षकांनी घटनास्थळ गाठून कन्हान पोलिसांना सूचना दिली. कन्हान ठाण्यातील रवी चौधरी, संतोष परतेती यांनी दरडीतील मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे शवविच्छेदनासाठी पाठविले.
सुरक्षारक्षकांना चोरट्यांचा धाक
गोंडेगाव, टेकाडी, कांद्री, कन्हान, पिपरी, धरमनगर येथील महिला व पुरुष अवैधरीत्या कोळसा उत्खनन करतात. वेकोलिच्या सुरक्षारक्षकांनी अनेकदा चोरट्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावरच चोरटे हत्यार घेऊन हल्ला करीत असल्याचे यावेळी समोर आले. यामुळे सुरक्षारक्षकच धाकात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com