कोठारीत दोन लाख रूपयाची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

गोंड पिपरी : दारूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी मोहिम सूरू केली आहे. परवा रात्री कोठारीपासून एक किलोमिटर अंतरावर ठाणेदार संतोष अंबिके यांनी एका कारवाईत 1 लाख 90 हजार रूपयाची दारू जप्त केली. अंधाराचा फायदा घेत आरोपी जंगलात पळाले. चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षकपदाची सुत्रे हाती घेताच डॉ. महीश्वर रेड्डी यांनी बड्या दारूमाफियांवर कार्यवाहीची मोहीम सूरू केली आहे.

याचसोबत जिल्ह्यातील ठाण्याची सुत्र सांभाळणाऱ्या ठाणेदारांनाही दारूमाफियांच्या मुसक्या आवळविण्यासंदर्भात आदेशे देण्यात आले आहेत. मुख्य मार्गावर असलेल्या कोठारीत चंद्रपूरवरून मोठ्या प्रमाणावर दारूतस्करी व्हायची. पण कोठारी ठाण्याचा प्रभार हाती घेताच ठाणेदार संतोष अंबिके यांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करून तस्करीवर आळा घातला. पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावागावात त्यांनी तंटामुक्त समित्या, पोलिस पाटील यांच्याशी प्रभावी समन्वय साधला. यामुळे चोरून होत असलेल्या दारूविक्रीला मोठाच आळा बसला. अशात परवा रात्रीच्या सुमारास कोठारी कवडजई मार्गावर एका कारमध्ये दारूची वाहतूक होणार असल्याची माहीती त्यांना मिळाली. ठाणेदार संतोष आंबिके, हवालदार रागीट पेंढारकर, शिपाई बालाजी हरी मडावी यांना घेऊन कारवाईसाठी निघाले.

पोलिसांना बघून आरोपींनी लगतच्या जंगलात पळ काढला. रात्रीची वेळ अन जंगल यामुळे पळून जाण्यात ते यशश्वी झाले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता तिथे 1900 देशी दारूच्या शिशा आढळल्या. या दारूची किंमत 1 लाख 90 हजार रूपये एवढी आहे. यासोबातच वाहनाची किंमत साडेतीन लाख असा एकून 5 लाख 40 हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला. घटनेचा पंचनामा करून माल ताब्यात घेण्यात आला. वाहनाच्या मालकाचा व पसार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनूसार कार्यवाही केली. एक लाख नव्वद हजार रूपयाची दारू जप्त करण्यात आली.

-संतोष अंबिके, ठाणेदार कोठारी

Web Title: Two lakh rupees worth of liquor was seized in the kothari