दोन लाख मतदार बजावणार हक्क 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

अमरावती - अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 2 लाख 10 हजार 511 मतदार 280 मतदान केंद्रांवरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

अमरावती - अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 2 लाख 10 हजार 511 मतदार 280 मतदान केंद्रांवरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्तांनी 23 डिसेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर केली होती. त्यात 2 लाख 7 हजार 741 मतदारांचा समावेश होता. मतदार नोंदणीला मुदतवाढ मिळाल्याने आणखी 9 हजार 67 मतदारांची नोंदणी झाली. पैकी 32 अर्ज फेटाळण्यात आले. आता 7 जानेवारीला जाहीर झालेल्या अंतिम मतदारयादीनुसार पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची संख्या 2 लाख 10 हजार 511 झाली. सर्वाधिक 76 हजार 671 मतदार अमरावती जिल्ह्यात, तर सर्वांत कमी 18 हजार 736 मतदारसंख्या वाशीम जिल्ह्यात आहे. 

या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 10) नोटिफिकेशन निघणार आहे. तेव्हापासूनच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होईल. 17 तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील. 18 जानेवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 20 जानेवारीला उमेदवारी मागे घेता येईल. पश्‍चात अंतिम उमेदवारांची चिन्हांसह यादी प्रसिद्ध होऊन 3 फेब्रुवारीला मतदान आणि 6 फेब्रुवारीला मतमोजणी घेतली जाईल, अशी माहिती आहे. 

बुलडाण्यात दोन तृतीयपंथी मतदार 
पदवीधर मतदारसंघाच्या अंतिम यादीत बुलडाणा जिल्ह्यातून दोन तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली. त्यांच्या मतदानाचे चित्रीकरण करण्याची व्यवस्था मतदान केंद्रांवर ठेवली जाईल. 

जिल्हानिहाय मतदार व केंद्र 
जिल्हा ः पुरुष ः महिला केंद्र 
अमरावती ः 45,909 ः 30,762 ः 91 
अकोला ः 30,326 ः 16,860 ः 66 
बुलडाणा ः 26,627 ः 8290 ः 39 
वाशीम ः 14428 ः 4308 ः 27 
यवतमाळ ः 23,125 ः 9,874 ः 57 

Web Title: Two million voters the right to play