स्वाइन फ्लूने आणखी दोन महिलांचा मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रकोप वाढत आहे. रुग्णसंख्येत घट होण्याऐवजी गतीने वाढ होत आहे. दर दोन दिवसांनंतर स्वाइन फ्लूने मृत्यू होत आहेत. बुधवारी २४ मे रोजी दोन महिलांचा स्वाइन फ्लूच्या बाधेने मृत्यू झाला असल्याचे उजेडात आले. भंडारा येथील ५५ वर्षीय, तर अकोला जिल्ह्यातील राहटगाव येथील पंचेचाळीस वर्षीय महिलांचा मृत्यू झाला. एकाचवेळी दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. दोन्ही महिलांवर मेडिकल आणि खासगी रुग्णालयात उपचार झाले. गुंतागुंत झाल्यानंतर परत मेडिकलमध्ये आणले. उपचाराला दाद मिळत नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

नागपूर - दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रकोप वाढत आहे. रुग्णसंख्येत घट होण्याऐवजी गतीने वाढ होत आहे. दर दोन दिवसांनंतर स्वाइन फ्लूने मृत्यू होत आहेत. बुधवारी २४ मे रोजी दोन महिलांचा स्वाइन फ्लूच्या बाधेने मृत्यू झाला असल्याचे उजेडात आले. भंडारा येथील ५५ वर्षीय, तर अकोला जिल्ह्यातील राहटगाव येथील पंचेचाळीस वर्षीय महिलांचा मृत्यू झाला. एकाचवेळी दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. दोन्ही महिलांवर मेडिकल आणि खासगी रुग्णालयात उपचार झाले. गुंतागुंत झाल्यानंतर परत मेडिकलमध्ये आणले. उपचाराला दाद मिळत नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. आता मृत्यू पावलेल्यांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे. याशिवाय दो महिला आणि एक पुरुष पुन्हा व्हेंटिलेटरवर आहे. जानेवारी ते १८ मे २४ मेपर्यंत नागपूर शहरात एकूण १०१ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: Two more women died due to swine flu