ग्यारापत्ती जंगल परिसरात दोन नक्षल्यांना कंठस्नान

File photo
File photo

कोरची (जि. गडचिरोली) : कोरची पोलिस स्टेशनअंतर्गत ग्यारापती पोलिस मदत केंद्राच्या ग्यारापत्ती जंगल परिसरात सी-60 पोलिस जवान आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
ग्यारापत्ती जंगल परिसरात मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिस पथकानेही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत काही नक्षली ठार झाल्याची तसेच काही जखमी झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिस पथकाच्या हाती लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com