धुर्वे कुटुंबावर काळाचा घाला; वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

धुर्वे कुटुंबावर काळाचा घाला; वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
SYSTEM

यवतमाळ : विरुद्घ दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या भीषण अपघातात दोन चिमुकल्या मुलांसह वडिलांचा जागीच मृत्यू (Two small child along with father died) झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (ता. २५) दुपारच्या सुमारास पांढरकवडा मार्गावरील वाकी फाट्याजवळ घडली.

सुनील कर्णुजी धुर्वे (वय ३८, रा. वळवाट, ता. पांढरकवडा), हार्दिक सुनील धुर्वे (वय आठ), ऋग्वेद सुनील धुर्वे (वय पाच) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात नम्रता सुनील या गंभीर जखमी झाल्या. धुर्वे कुटुंबीय यवतमाळ येथून पांढरकवडाकडे जात असताना वाकी फाट्याजवळ विरुद्घ दिशेने आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक (Road accident) दिली.

धुर्वे कुटुंबावर काळाचा घाला; वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
पुतीन यांचा प्रवास; गुप्तचर अधिकारी कसा झाला शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष

धडक इतकी भीषण होती की, दोन चिमुकल्यांसह वडिलांचा जागीच मृत्यू (Two small child along with father died) झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नम्रता धुर्वे यांना उपचारासाठी यवतमाळातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com