हिमस्खलनात अकोल्यातील दोन जवान शहीद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

अकोला - काश्‍मीरमधील गुरेझ सेक्‍टर येथे झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आज (ता. 27) दिली. संजय सुनील खंडारे (वय 27, रा. माना ता. मूर्तिजापूर. जि. अकोला), आनंद शत्रुघ्न गवई (वय 26, रा. पंचशीलनगर, अकोला) अशी या जवानांची नावे आहेत.

बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच हिमस्खलनाच्या दोन घटना 25 जानेवारी रोजी घडल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्‍यातील माना रहिवासी जवान संजय सुनील खंडारे व वाशीम बायपास परिसरातील पंचशीलनगरमधील आनंद शत्रुघ्न गवई यांचा समावेश आहे. हिमस्खलनामध्ये शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव मिळाल्यानंतर त्यांना श्रीनगरमध्ये आणण्यात येईल. तेथून विशेष विमानाने नवी दिल्लीहून नागपूर व त्यानंतर अकोल्यामध्ये आणण्यात येईल. शहिदांचे पार्थिव अकोला जिल्ह्यात आणल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे.

Web Title: Two soldiers killed in Akola snow fall