पंढरपूरसाठी दोन विशेष रेल्वे

file photo
file photo

नागपूर  : विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर आहे. आषाढी एकादशी पर्वावर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी आहे. भाविकांच्या सुविधेसाठी यंदासुद्धा पंढरपूरसाठी नागपूर-पंढरपूर आणि नागपूर-मिरज अशा दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. याच गाड्या परतीच्या प्रवासाठीसुद्धा उपलब्ध असतील.
01206 नागपूर-पंढरपूर विशेष रेल्वे 10 जुलैला सकाळी 7.50 वाजता नागपूर स्थानकाहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी पहाटे 4.10 वाजता पंढरपूरला पोहचेल. हीच गाडी 01205 क्रमाकासह 13 जुलै रोजी पहाटे 5.30 वाजता पंढरपूर स्थानकाहून नागपूरकडे रवाना होईल आणि रात्री 11.30 वाजता नागपूर स्थानक गाठेल.
या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूररेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, आणि कुर्डुवाडी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. याचप्रमाणे 01263 नागपूर-मिरज स्पेशल ट्रेन 9 जुलैला सकाळी 7.50 वाजता नागपूर स्थानकाहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. वीस मिनिटांच्या थांब्यानंतर मिरजकडे रवाना होईल. हीच गाडी 01264 क्रमांकासह 14 जुलैला मध्यरात्रीनंतर 2.45 वाजता मिरजहून पंढरपूरच्या दिशेने रवाना होईल. पहाटे 4.55 वाजता पंढरपूरला पोहचेल आणि रात्री 11.30 वाजता नागपूर स्थानक गाठेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूररेल्वे, बडनेरा, मूर्तीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डवाडी, पंढरपूर, संगोला, म्हसोबा डोंगरगाव, जाठ रोड, ढालगाव, कवठेमहाकाळ, सलगरे, अरग स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यांना दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, 12 शयनयान आणि 2 जनरल डबे असतील. भाविकांची संख्या लक्षात घेतला रेल्वेने केलेली सुविधा तोकडी असून फेऱ्या वाढविण्याची मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com