दोन विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

माजरी (जि. चंद्रपूर) - वर्धा नदीवर पार्टीसाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना वरोरा तालुक्‍यातील माजरी येथे गुरुवारी (ता.27) सायंकाळी घडली. दोन्ही मृतदेह शोधण्यात पोलिसांना शुक्रवारी यश आले. यवनकुमार पारसनाथ भारती (16, रा. भांदेवाडा वेकोली कॉलनी, वणी), मोहम्मद जावेद आलमवीर अली (वय 16, रा. माजरी) अशी मृतांची नावे आहेत.

यवनकुमार आणि मोहम्मद जावेद हे दोघे अन्य मित्रांसोबत वर्धा नदी परिसरात पार्टीसाठी आले होते. पोहण्यासाठी सायंकाळी ते दोघे नदी पात्रात उतरले. त्या वेळी खोल पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. अन्य मित्रांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यवनकुमार हा पॉलिटेक्‍निकचे शिक्षण घेत होता. मोहम्मद जावेद हा अकरावीत होता.

Web Title: Two students death because drowned in river