दुचाकीला अपघात; अमरावतीचे दोन विद्यार्थी ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

दुचाकीला झालेल्या अपघातात अमरावती येथील शिवाजी कॉलेजचे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटात रविवारी (ता. 12) सकाळी नऊ वाजतादरम्यान ही घटना घडली. दुभाजकावर आदल्यामुळे वा एकाच बाजूने येणाऱ्या अनोळखी वाहनाच्या धडकेने हा अपघात घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

तळेगाव, आर्वी (जि. वर्धा) - दुचाकीला झालेल्या अपघातात अमरावती येथील शिवाजी कॉलेजचे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटात रविवारी (ता. 12) सकाळी नऊ वाजतादरम्यान ही घटना घडली. दुभाजकावर आदल्यामुळे वा एकाच बाजूने येणाऱ्या अनोळखी वाहनाच्या धडकेने हा अपघात घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मृतांचे नाव प्रतीक प्रदीपराव वानखेडे (वय 22) रा. चक्रपाणी कॉलनी, अमरावती व शुभम विनायकराव रवराळे (वय 22) रा. मोहननगर, नागपूर असे आहे. प्रतीक आणि शुभम रवराळे हे दोघे आज सकाळी सात वाजता नागपूर येथून एमएच 27, बीएम 2356 क्रमांकाच्या दुचाकीने अमरावतीकडे निघाले. सत्याग्रही घाटातील इंदरमारी बसथांब्याजवळ पोहोचताच हा अपघात घडून आला. अपघात नेमका कसा घडला, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. दोघेही रस्त्यावर जोरदार आदळल्यामुळे गंभीररीत्या जखमी झाले व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही अमरावती येथील शिवाजी कॉलेजमध्ये बीएस्सी कृषी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होते. आष्टी तालुक्‍यातील इंदरमारी बसथांब्यापासून एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. या घटनेची तळेगाव (श्‍यामजीपंत) पोलिस ठाण्यात नोंद आहे. पुढील तपास ठाणेदार मनोहर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जमादार वसंत इंगळे, नीलेश पेटकर हे करीत आहेत.

Web Title: Two students killed in two wheeler accident