निवडणूक कर्तव्यावरून परतणाऱ्या दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीसाठी हिंगणा येथील मतदान केंद्रावर कर्तव्य बजावून घरी परत येणाऱ्या उमरेड येथील शिक्षकांच्या कारचा नागपूर-उमरेड मार्गावरील चांपा येथील हळदगाव फाट्यावर शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास अपघातात झाला. यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. नुकेश नारायण मेंढुले (वय 38) व पुंडलिक बापूराव बाहे (वय 57, दोघेही रा. उमरेड) अशी त्यांची नावे आहेत.

उमरेड (जि. नागपूर) - लोकसभा निवडणुकीसाठी हिंगणा येथील मतदान केंद्रावर कर्तव्य बजावून घरी परत येणाऱ्या उमरेड येथील शिक्षकांच्या कारचा नागपूर-उमरेड मार्गावरील चांपा येथील हळदगाव फाट्यावर शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास अपघातात झाला. यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. नुकेश नारायण मेंढुले (वय 38) व पुंडलिक बापूराव बाहे (वय 57, दोघेही रा. उमरेड) अशी त्यांची नावे आहेत.

उमरेड येथील अशोक विद्यालयातील मेंढुले, खापर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाहे, खैरी(बुटी) शाळेचे मुख्याध्यापक विजय बहुरूपी व सिल्ली शाळेतील नरेंद्र पिपरे यांची रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी हिंगणा तालुक्‍यातील डिगडोह येथील मतदान केंद्रावर ड्यूटी लावण्यात आली होती. गुरुवारी (ता. 11) मतदानानंतर सर्व साहित्य जमा करून रात्री उशिरा उमरेडकरिता नागपूरहून निघाले. दोन दिवसांच्या थकव्यामुळे कारमध्ये बसल्यावर त्या तिघांना झोप लागली होती. चांपा येथून जात असताना वाहनचालक नरेंद्र पिंपळे यांनाही झोप आल्याने नियंत्रण सुटून कार थेट एका झाडावर आदळून अपघात झाला.

Web Title: Two Teacher Death in Accident