बुलडाण्यातील दोन शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारात 

विरेंद्रसिंह राजपूत
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नांदुरा (बुलडाणा) : सन 2017/18 च्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर 108 शिक्षकांची निवड केली असून त्यामध्ये 38 प्राथमिक शिक्षक, 39 माध्यमिक शिक्षक, 18 आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणारे शिक्षक, 8 सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, 2 विशेष शिक्षक कला/ क्रीडा, 1 अपंग शिक्षक/अपंग विभागाच्या शाळेवरील शिक्षक, 1 गाईड शिक्षक व 1 स्काऊट शिक्षक यांचा समावेश आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल कनिराम चव्हाण यांना प्राथमिक राज्य शिक्षक पुरस्कार तर बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील विद्या विकास माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक सुनील नामदेवराव जवंजाळ यांना राज्यस्तरीय माध्यमिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राज्य शिक्षक पुरस्कार योजना ही राज्यात  सन 1962/63 पासून कार्यान्वित असून ती शालेय शिक्षण विभागाकडून राबविली जाते. समाजाची निस्वार्थ भावाने व निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना 'राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार'योजना दरवर्षी जाहीर करण्यात येते. यावर्षीच्या या पुरस्कारासाठी शालेय शिक्षण व क्रीडा स्तरावर 108 शिक्षकांची निवड करण्यात आली असून या शिक्षकांत बुलडाणा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रत्येकी 1 प्रमाणे 2 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून दोन्हीही मुख्याध्यापक आहेत. 

Web Title: Two teachers receive state-level best Teacher Award from buldana