भारत-इंग्लंड युवा संघांदरम्यान नागपुरात दोन कसोटी सामने

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नागपूर : भारत आणि इंग्लंड यांच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघांमध्ये दोन कसोटी सामने विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर खेळले जाणार आहे.
पहिला चारदिवसीय कसोटी सामना येत्या 13 ते 16 फेब्रुवारीदरम्यान खेळला जाईल. दुसरी कसोटी 21 ते 24 फेब्रुवारीदरम्यान होईल. माजी कसोटीपटू राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळत असलेल्या भारतीय युवा संघाचे नेतृत्व जॉंटी सिद्धू करणार आहे. इंग्लंडचे नेतृत्व मॅट फिशर करेल. नुकत्याच संपलेल्या पाच एकदिवसीय मालिकेत भारताने इंग्लंडचा 3-1 ने पराभव केला होता.

कसोटी सामन्यांसाठी दोन्ही संघांचे आगमन गुरुवारी दुपारी साडेचारला होईल. हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये संघांचा मुक्‍काम राहील.

अक्षय वाडकरकडे नेतृत्व
23 वर्षांखालील मुलांच्या कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील बडोदाविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी अक्षय वाडकरकडे विदर्भ संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. उभय संघादरम्यानचा चारदिवसीय सामना 10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर खेळला जाणार आहे. साखळी फेरीत धमाकेदार प्रदर्शन करून विदर्भाने बादफेरी गाठली होती.

विदर्भ संघ : अक्षय वाडकर (कर्णधार), सचिन कटारिया (उपकर्णधार), सिद्धेश वाठ, मोहित काळे, आर. संजय, अली झोरेन खान, अक्षय अग्रवाल, राज चौधरी, ललित यादव, पार्थ रेखडे, अथर्व मनोहर, दर्शन नलकांदे, जसवीरकुमार सैनी, शुभम दुबे व अथर्व देशपांडे. प्रशिक्षक सुधीर वानखेडे.

Web Title: Two Test matches of India-England to be held in nagpur