उष्माघाताने पुन्हा घेतला दोघांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

नागपूर : जून महिन्यात उन्हाचा पारा वाढताच असून उष्माघाताने विदर्भात पुन्हा दोघांचा बळी गेला. गोंदिया जिल्ह्यातील वृद्धाचा; तर भंडारा जिल्ह्यातील ट्रकचालकाचा समावेश आहे. अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) ः येथील जुन्या बसस्थानकावर 60 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.11) सकाळी 11 च्या सुमारास घडली. रमेश खोब्रागडे (रा. निमगाव) असे मृताचे नाव आहे. रमेश हा अपना घर हॉटेल येथे काही दिवसांपूर्वी भांडी साफ करण्याचे काम करीत होता. भंडारा : साकोलीजवळील वडद फाटा येथे ट्रकचालकाचा आकस्मिक मृत्यू झाला. संजय ग्यानीराम तरोणे (वय 32, रा. बाम्हणी) असे मृताचे नाव आहे.

नागपूर : जून महिन्यात उन्हाचा पारा वाढताच असून उष्माघाताने विदर्भात पुन्हा दोघांचा बळी गेला. गोंदिया जिल्ह्यातील वृद्धाचा; तर भंडारा जिल्ह्यातील ट्रकचालकाचा समावेश आहे. अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) ः येथील जुन्या बसस्थानकावर 60 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.11) सकाळी 11 च्या सुमारास घडली. रमेश खोब्रागडे (रा. निमगाव) असे मृताचे नाव आहे. रमेश हा अपना घर हॉटेल येथे काही दिवसांपूर्वी भांडी साफ करण्याचे काम करीत होता. भंडारा : साकोलीजवळील वडद फाटा येथे ट्रकचालकाचा आकस्मिक मृत्यू झाला. संजय ग्यानीराम तरोणे (वय 32, रा. बाम्हणी) असे मृताचे नाव आहे. बाम्हणी येथील ट्रकचालक संजय ग्यानीराम तरोणे (वय 32) ट्रक घेऊन गेला असता वडद फाटा येथे त्याची प्रकृती बिघडली. तेथे त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. साकोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.  
गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी 3 जून रोजी कुलगुरू व शिक्षण संचालकांना निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महादेव वासेकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two victim of sunstroke