दोघांवर गोळीबार करणाऱ्यांना नांदेडमध्ये अटक

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 11 एप्रिल 2019

नांदेड - शहरालगत दोघावर गोळीबार करून एकाला ठार मारणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी बुधवारी (ता. १०) नांदेड परिसरातून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून दोन देशी बनावटी कट्टे (पिस्तुल), तीन जिवंत काडतूस, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली. अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषेदेत दिली. 

सोमवारी (ता. आठ) च्या मध्यरात्री स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठासमोर डॉ. सतीश गायकवाड हे आपल्या कुटूंबियासह अहमदपूरहून नांदेडकडे कारमधून येत होते. यावेळी त्यांच्यावर दुचाकीवरील हल्लेखोरांनी गोळीबार केला. मात्र चालकाने गाडी थाबविताच गोळीचा निशाना चिकला व तो पाठीला चाटून गेला. यात डॉ. व चालक जखमी झाला. यानंतर हल्लेखाराने बॉम्ब शोधक व नाशक पथक कार्यालसमोर अहमदपूर येथील शेख नजीब अब्दुल गफार यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार मारले. त्याची कार सोबत घेऊन नांदेड शहारत पसार झाले. गाडीतील अत्याधूनीक यंत्रामुळे (जीपीएस प्रणाली) गाडीचा शोध लागला. 

अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपाधिक्षक धनंजय पाटील, अभिजीत फस्के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे, ग्रामिणचे पंडीत कच्छवे, इतवाराचे प्रदीप काकडे, वजिराबादचे संदीप शिवले, एपीआय विनोद दिघोरे, नंदकिशोर साळुंके यांच्यासह आदी अधिकाऱ्यांनी शहरात व परिसरात नाकाबंदी करून कसुन चौकशी केली. गुप्त माहितीवरुन स्थागुशाचे श्री. दिघोरे यांच्या पथकांनी अखेर माग काढत एका शेतातून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्टल, तीन जिवंत काडतूस, एक दुचाकी, मयता शेख नजीब यांची कार आणि मोबाईल जप्त केला. सदर गुन्ह्याची कबुली दिली असून, उर्वरीत दोन हल्लेखोर पसार आहेत. परिश्रम घेऊन आरोपींना अटक केल्या पथकाला श्री. जाधव यांनी पारितोषीक जाहीर केले. गुरूवारी नांदेड न्यायालयसमोर हजर करणार असल्याचे एसपी संजय जाधव यांनी सांगितले.
 
Web Title: two were arrested in Nanded for firing