दुचाकी अपघातात पती-पत्नीसह मुलगा ठार

दुचाकी अपघातात पती-पत्नीसह मुलगा ठार

देऊळगाव राजा : दुचाकी व  मालवाहू 407 च्या समोरासमोर झालेल्या अपघातात पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता.11) दुपारी शहरानजीक कुंभारी फाट्यानजीक घडली. सदर अपघातातील जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असता त्याला औरंगाबाद हलविण्यात आले होते परंतु, त्याचा वाटेच मृत्यू झाला.

देऊळगाव राजा (जिल्हा बुलडाणा) तालुक्यातील कुंभारी येथील मुख्यदल दांपत्य येथून दुचाकी क्रमांक एम एच 21 यु 1114 उंबरखेड येथे घराकडे परत येत होते. कुंभारी फाट्यानजीक चिखली कडे जाणाऱ्या 407  क्रमांक एम एच 04 डी एस 6368 ने दुचाकीस समोरासमोर धडक दिली. सदर अपघातात गुलाब नामदेव मुख्यदल (वय 35) व त्यांची पत्नी अलकाबाई गुलाब मुख्यदल (वय 31) जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा आकाश गंभीर जखमी झाला अपघातानंतर उपस्थित नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेहासह गंभीर जखमी मुलाला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सदर अपघातातील जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला प्रथमोपचारानंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते परंतु, त्याचाही मृत्यू झाला.

अपघातास कारणीभूत 407 वाहनास पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालक फरार आहे. पोलिसांनी चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. काळाने झडप घातलेलं दाम्पत्य हे शेत मजूर असून, त्यांच्या मागे आरती (वय 15) व विकास (वय 12) दोन मुले असून, त्यांच्या डोक्यावरील छत्र हरविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

चौपदरीकरणाच्या रखडलेले काम ठरले कारणीभुत
शहरापासून चिखली मार्गावर चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. रखडलेल्या सदर चौपदरीकरणाच्या कामामुळे एक ठिकाणी गिट्टी मुरूम टाकलेला आहे. तर अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी रस्ता अरुंद बनला आहे. चिखली मार्गावरील पेट्रोल पंप ते कुंभारी पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून धोकादायक बनलेले हे खड्डे अनेक लहान-मोठ्या अपघातास कारण बनले आहे. आज घडलेला अपघात चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे घडला असल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com