चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

काटोल (जि. नागपूर) : पारडसिंगा राज्य मार्गावरील मंदिर वळणावर मालवाहू चारचाकी व दुचाकी धडकेत दुचाकीचालक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. श्रीराम सुदाम डेंगे (वय 50, डुंमरी, ता. पारशिवनी) असे मृत दुचाकीचालकाचे नाव असून जखमीत रमेश सुरजुसे यांचा समावेश आहे. अज्ञात चारचाकीचालकाने पळ काढला.

प्राप्त माहितीनुसार, श्रीराम व सहप्रवासी रमेश सुरजुसे नागपूर येथून दुचाकीने सकाळी वरुड येथील लग्नाला निघाले. पारडसिंगा वळणावर सकाळी अकराच्या सुमारास अपघात घडला. येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहन आमनेसामने वेगात आल्याने जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार सिमेंट रोडवर आदळले. यात मृताच्या डोक्‍याला गंभीर मार व पाय तुटल्याने झालेल्या रक्तप्रवाहात त्याचा जागीच मृत्यू झाला. रमेश याचासुद्धा पाय तुटला व गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी नागपूरला हलविले. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. श्री अनसूया माता संस्थान परिसरात अपघात घडल्याने वाटसरूंनी मदत केली. काटोल पोलिसांना माहिती देऊन ठाणेदार सतीशसिंग राजपूत यांनी जखमीला उपचारास हलविले. खोळंबलेली वाहतूक सुरळीत करून दोन्ही क्षतीग्रस्त वाहने काटोल पोलिस ठाण्यात हलविली. आरोपी चारचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अरुण भेंडे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-wheeler killer